अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गॅबार्ड म्हणाल्या,”अशा कठीण काळात भगवद्गीता शक्ती आणि शांती देईल”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार असलेल्या तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या या अशांत काळामध्ये भगवद्गीतेतून निश्चितता, सामर्थ्य तसेच शांती मिळू शकते. हवाई येथील कॉंग्रेसच्या या ३९ वर्षीय सदस्याने आपल्या ऑनलाइन केलेल्या आवाहनात सांगितले की सध्याचा हा अराजकतेचा काळ आहे आणि उद्या काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही आहे. गॅबार्ड यांनी २०२० च्या हिंदू वर्गातील विद्यार्थ्यांसाठी म्हटले आहे की, “भगवद्गीतेत श्री कृष्णाने शिकवलेल्या भक्ती योग आणि कर्मयोगातून आपल्याला निश्चितता, सामर्थ्य आणि शांती मिळते.”

अमेरिकेच्या मिनियापोलिसमध्ये एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याकडून एका कृष्णवंशीय आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या विरोधात झालेल्या निषेधाच्या वेळी त्यांनी संबोधित केले. हिंदू विद्यार्थी परिषदेने ७ जून रोजी पहिले ऑनलाइन हिंदू संबोधन आयोजित केले होते ज्यामध्ये कोविड -१९ च्या या संकट काळात एकजुटता दाखवण्यासाठी फेसबुक आणि यूट्यूबवर हजारो प्रेक्षक आले होते.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जगभरात साथीच्या रोगाने ७६,००,००० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग बसला आहे आणि ४,२५,००० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अमेरिका या आजाराने सर्वाधिक बळी पडलेला देश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment