हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, काही विशिष्ट परिस्थिती व्यतिरिक्त पोलिसानी ‘चॉकहोल्ड’ (एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या गळ्यावर हाताने घट्ट करण्याचे तंत्र)चा वापर थांबवावा अशी त्यांची इच्छा आहे. ट्रॉक्स फॉक्स न्यूज चॅनलवर शुक्रवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला चॉकहोल्ड आवडत नाहीत. हे तंत्र थांबवलेच पाहिजे. “
मात्र, पोलिस अधिकारी जेव्हा एकटे असतात एक एक करत जेव्हा ते अनेक लोकांविरूद्ध लढत असतात तेव्हा अशा परिस्थितीत त्याच्या या वापरास ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, अशा परिस्थितीत ते या तंत्राचा वापर करु शकतील. जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाल्यानंतर ‘चॉकहोल्ड’ या तंत्राच्या वापराबाबत अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहे.
एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने फ्लॉईड याच्या मानेवर गुडघे टेकवले त्याच्या या कृतीमुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर देशभरातील आंदोलनांच्या पोलिस सुधारणांसह या तंत्रावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. देशातील अनेक विभागात याला यापूर्वीच बंदी घालण्यात आलेली आहे.
‘चॉकहोल्ड’ या तंत्रामध्ये अधिकारी संशयिताच्या मानेला हाताने घट्ट पकडतो ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे २०१४ मध्ये एरिक गार्नर या नागरिकाचा मृत्यू झाला आहे. देशभर झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊस पोलिस सुधारणांच्या शासकीय आदेशावर काम करत आहे. मात्र , त्यात ‘चॉकहोल्ड’ चा उल्लेख केला जाईल की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.