हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकीत चीन त्यांना विजयी होताना पाहू शकत नाही, असा आरोप ट्रम्प यांनी गुरुवारी केला.चीनच्या या कथित हेतूमागील कारणेही त्यांनी उघड केली आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “चीन मला पुन्हा निवडून येताना पाहू इच्छित नाही. त्याचे कारण म्हणजे चीनला टेरिफनुसार आम्हांला कोट्यवधी डॉलर्स द्यावे लागतील.” ट्रम्प यांनी अमेरिकेत चिनी उत्पादनांच्या आयातीवर टेरिफ शुल्क लादले आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील नात्यात तणाव निर्माण झाला आहे.
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुका जिंकण्यासाठी चीन माजी उपराष्ट्रपती जो बिडेन यांना मदत करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.असं मानलं जात आहे की बिडेन यांना विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उभे केले जाऊ शकते.
‘चीनने अमेरिकेला कधीही काहीही दिलेले नाहीये’असाही आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बिडेन तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधत म्हंटले कि त्यांनी चीन बरोबर गाठ जुळवण्याचा प्रयत्न केलाय.ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा प्रसार केल्याचा आरोप करून अनेकदा चीनला फटकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे की जगातील १४४ देश चीनमुळे सध्या ‘नरकसदृश परिस्थिती’ मधून जात आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात अॅरिझोनाला जात आहेत. कोरोना व्हायरसव्हा ग्लोबल साथीच्या रोगामुळे अमेरिकेतील शटडाउननंतरची त्यांची ही पहिलीच भेट आहे. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकारांना सांगितले की ते लवकरच नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीतील महत्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या ओहायोला भेट देतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.