हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध कला आणि पुरातन वस्तू जमा केलेल्या फॉरेस्ट फेन यांनी सांगितले की, एक दशकांपूर्वी रॉकी माउंटनच्या जंगलात त्याला दहा लाख डॉलर्सचा एक खजिना सापडला होता. गेल्या रविवारीच त्यांनी याबाबत विधान केले होते. जर हे दहा लाख डॉलर्स रुपयामध्ये मोजले गेले तर ते सुमारे ७.५ कोटी रुपये इतके होतात.
८९ वर्षीय फॉरेस्ट फेन यांनी “सांता फे न्यू मेक्सिकन” या मीडिया हाऊसला सांगितले की,’काही दिवसांपूर्वीच त्यांना हा खजिना मिळाला होता. मात्र, ज्याला हा खजिना सापडला त्याला त्याचे नाव बाहेर येऊ द्यायचे नाही आहे.’ तो म्हणाला की,’ या खजिन्याला शोधणाऱ्याने त्याला त्याचे छायाचित्र पाठवले आहे, ज्यामुळे याची पुष्टी मिळते आहे की ती व्यक्ती खजिन्यापर्यंत पोहोचली आहे.’
फॉरेस्ट फेनने या खजिन्याच्या लोकेशनबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याने २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या “द थ्रील ऑफ द चेस” या आपल्या आत्मचरित्रामध्ये खजिन्यापर्यंतच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी २४ ओळींची एक कविता लिहिली होती. जी एका कोड्या सारखीच होती आणि जी व्यक्ती ते कोडे सोडवेल तीच व्यक्ती त्या खजिन्यापर्यंत जाऊ शकत होती.
या खजिन्यात अनेक सोन्याचे नाणी, भरपूर दागदागिने आणि इतरही अनेक मौल्यवान वस्तू आहेत. अशा या खजिन्याला शोधण्यासाठी पश्चिमी अमेरिकेतील दुर्गम भागातील हजारो लोकांनी प्रयत्न केला आहे. यासाठी बर्याच लोकांनी आपली नोकरी देखील सोडली. या व्यतिरिक्त असेही म्हटले जाते की त्याच्या शोधत आतापर्यँत किमान चार जणांचा मृत्यू झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.