अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा दावा “कोविड -१९ च्या सर्वाधिक चाचण्या घेणारा अमेरिका एकमेव देश”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,भारतासह इतर दहा देशांच्या तुलनेत त्यांच्या देशाने कोविड -१९च्या सर्वांत जास्त चाचण्या घेतल्या आहेत. ट्रम्प यांनी रविवारी म्हटले की अमेरिका कोरोना व्हायरस रोगाविरूद्धच्या युद्धात प्रगती करीत आहे आणि देशाने आतापर्यंत ४१.८ लाख लोकांची चाचणी केली आहे.

ट्रम्प म्हणाले की जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत हा एक विक्रमच आहे. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की जर आम्ही फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, भारत, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि कॅनडा यांना एकत्रित केले तर आम्ही या देशांपेक्षा अधिक तपासण्या केल्या आहेत. अमेरिकेत कोविड -१९ मुळे झालेल्या मृतांची संख्या ४०,००० झाली आहे आणि आतापर्यंत एकूण ७,६४,००० लोकांना संसर्ग झाला आहे.

कोविड -१९ ने न्यूयॉर्कमध्ये सर्वात घातक २,४२,००० संसर्ग झाल्याच्या घटना घडलय आहेत आणि आतापर्यंत १७,६०० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. गेल्या आठ दिवसांत येथे नोंदविण्यात आलेल्या नवीन घटनांमध्ये ५०टक्के घट झाली आहे. ट्रम्प म्हणाले की हा आकडा चांगला आहे. संकटात गेल्यानंतर हे पाहणे चांगले आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इटली आणि स्पेनसारख्या देशांमध्ये सुरुवातीला लॉकडाउन लागू करण्याच्या विरोधात होते या देशांना मोठी किंमत मोजावी लागली आहे.

ते म्हणाले की, जर लॉकडाऊन देशात लागू केले गेले नसते आणि सोशल डिस्टंसिंग सारख्या उपाययोजना केल्या नसत्या तर लाखो लोकांचा मृत्यू झाला असता. ट्रम्प यांनी या जागतिक साथीच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्या प्रशासनाने युद्धपातळीवर उचललेल्या कामांचा यांचा आढावा घेत आणि देश सुरक्षित असल्याचे सांगून देशवासियांना धीर दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.