हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरटीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री वडेट्टीवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. “पडळकर अजून नवे आहेत, नव्या पक्षाप्रमाणे ते फडफडत आहेत. ‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है,” असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.
मंत्री वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टातून ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात येणारा निकाल हा ओबीसींच्या बाजूने लागेल, असा विश्वास आहे. काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्दय्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. त्यांच्याबाबत सांगायचे झाले तर ‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’. ज्या व्यक्तीवर लुटमारीचे, फसवणुकीचे, लोकांची शेती चोरल्याचे असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अशा माणसाबद्दल काही बोलायचे नाही. ते नवे आहेत.
गोपीचंद पडळकर हे एका नव्या पक्षाप्रमाणे फडफडत आहेत. आम्ही पडळकरांच्या खात्यात पाच कोटी दिले आहेत. तरीही ते पैसे कमी मिळाले असल्याचे सांगत आहेत. आता आम्ही दिलेल्या पैशाचे काय करायचं हा पडलकरांचा अधिकार आहे. त्यांना परवानची काही गरज नाही. अर्धवट माहितीच्या आधारे पडळकर बोलत आहेत,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.