Virat Kohli : विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध शतक करून सचिनच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आज भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) खणखणीत शतकी खेळी करून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजचे शतक हे विराट कोहलीच्या (Virat Kohli) कारकिर्दीतील 73 वं शतक ठरलं. तसेच वनडे क्रिकेटमधील 45 वे शतक ठरले. याचबरोबर विराटचं हे गेल्या महिन्याभरातील दुसरे एकदिवसीय शतक ठरलं आहे.

विराटचं महिन्याभरातील हे दुसरं शतक ठरलंय. याआधी विराटने (Virat Kohli) बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बरोबर एक महिन्याआधी 10 डिसेंबरला शतकी खेळी केली होती. विराटने त्यावेळी 91 बॉलमध्ये 11 फोर आणि 2 सिक्ससह 113 रन्स केल्या होत्या. तर आजच्या सामन्यात विराटने श्रीलंका विरुद्ध 87 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 सिक्ससह 113 रन्स केल्या आहेत.

सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी
विराट कोहलीने (Virat Kohli) आजच्या शतकासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने मायदेशात आतापर्यंत 20 एकदिवसीय शतक ठोकले आहेत. तर आता विराटने त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू
1. सचिन तेंडुलकर – 20
2. विराट कोहली-20*
3. हाशिम आमला – 14
4. रिकी पाँटिंग -13

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती