हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉईज लॉकर रूमच्या वादानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जावी, असा बहुतेकांचा विश्वास आहे.चला तर मग जाणून घेऊयात बॉईज लॉकर रूम म्हणजे नक्की काय आहे,त्यामुळे दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिस तसेच इंस्टाग्रामला नोटीस दिली असून ८ मे पर्यंत यासंबंधी जाब विचारला आहे.
बॉईज लॉकर रूमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलींच्या फोटोंवर अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जातात.यावर बरेच विद्यार्थी चॅटिंगही करतात आणि या चॅटिंगला प्रतिक्रिया देखील मिळत आहे.यात मुलींविषयी असे अश्लील भाष्य केले जाते जे अत्यंत आक्षेपार्ह असून कारवाईच्या कक्षेत येते.ट्विटरवर व्हायरल झालेल्या या चॅटिंगच्या स्क्रीनशॉट्सनुसार या ग्रुप चॅटिंग दरम्यान मुलींसोबत असभ्य वर्तन करण्याचा कट रचला जात आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बॉईज लॉकर रूम ग्रुप तयार झाला आहे.यात ग्रुप ऍडमिन सह एकूण डझनभर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये समाविष्ट झालेले हे विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमधील आहेत,जे अल्पवयीन वर्गात मोडतात.
सोशल मीडियामुळे जिथे लोकांना भरपूर फायदे मिळाले आहेत,तिथेच त्याच्या चुकीचा वापर केल्याने बर्याचदा मोठी समस्या देखील उद्भवू शकते.असेच काहीसे या शाळकरी मुलांनी तयार केलेल्या या इन्स्टाग्राम ग्रुपद्वारे केले जात आहे.बॉईज लॉकर रूम नावाच्या या ग्रुपला इन्स्टाग्रामवर शालेय मुलींविषयी आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याविषयी अश्लील टिप्पण्या दिल्या जात होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर तयार केलेला हा शालेय विद्यार्थ्यांचा एक ग्रुप आहे. ज्यामध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींचे फोटोज शेअर करतात आणि त्याविषयी अश्लील बोलतात.तसेच, मुले बलात्काराच्या अनेक पद्धतींबद्दलही चर्चा करतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.