लढा कोरोनाशी | अक्षय चंद्रकांत फडतरे
प्लाझ्मा थेरपीच्या मदतीने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना बरं करता येऊ शकतं का, अशा प्रकारच संशोधन सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात सुरु आहे. संशोधक तसेच तज्ञ मंडळी याबाबत कसोशीने प्रयत्न करत आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा चाचणी म्हणून वापर करण्यास परवानगी आहे. अमेरिकेत रोज हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरू शकेल असा आशावाद बाळगून संशोधक शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. या थेरपीच्या अनेक चाचण्या घेऊन सरकार त्याबतच निश्चित धोरण ठरवणार आहे.
प्लाझ्मा थेरपी म्हणजे नक्की काय ? – आपल्या शरीरात एखाद्या जिवाणूचा किंवा विषाणूचा संसर्ग झाला तर अशा वेळेला आपल्या शरीरात त्या जिवाणूशी किंवा विषाणूशी लढण्यासाठी प्रतिजैविके तयार होतात. जे रुग्ण अशा जिवाणू किंवा विषाणूपासून झालेल्या रोगातून बरे झालेले असतात त्यांच्या शरीरात त्या जिवाणू किंवा विषाणू विरुद्ध प्रतिजैविके तयार झालेली असतात. अशा रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा (रक्तद्रव) हा या रोगाच्या बाधित रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो आणि यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात.
रोगमुक्त झालेली व्यक्ती ही एका वेळेला २-३ रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेल इतकं प्लाझा देऊ शकते. त्याचप्रमाणे अशी व्यक्ती आठवड्यातून किमान एकदा तरी प्लाझ्मा दान करू शकते. आज अमेरिकेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेसहा लाखांवर पोहोचली आहे आणि कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ४५,००० च्या आसपास आहे.त्यामुळे बरे झालेलं रुग्ण हे मोठ्या संख्येने प्लाझ्मा देण्यासाठी स्वेच्छेने संशोधन संस्थामध्ये जात आहेत.
लसीकरण आणि प्लाझ्मा थेरपी या दोन वेगवेगळ्या वैद्यकीय संकल्पना आहेत. भविष्यात एखाद्या जिवाणू किंवा विषाणूचा संसर्ग झाला तर त्याविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी प्रतिजैविके तयार करण्याच्या प्रक्रियेला लसीकरण म्हणतात. तर काही वेळेस रोगाचा मुकाबला करण्यासाठी बाहेरून आणि तात्काळ प्रतिकारशक्ती पुरवली जाते, त्यास प्लाझ्मा थेरपी म्हणतात. लसीकरणामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती ही दीर्घकाळ टिकून राहते. याउलट प्लाझ्मा थेरपी मुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती ही जास्त काळ टिकत नाही पण उपचारासाठी नक्कीच मदत करू शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण
२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे
सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य
राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांना ‘ही’ महत्त्वाची सूचना; म्हणाले..
खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी सुरू केला तपास
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in