… आणि कोमामधून बाहेर येताच तो चक्क बोलू लागला फ्रेंच … जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडमध्ये नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होते आहे. येथे रोरी कर्टिस नावाच्या एका फुटबॉलरचा २०१४ मध्ये एक भयंकर अपघात झाला ज्यानंतर तो ६ दिवस कोमामध्ये होता. मात्र याविषयी धक्कादायक गोष्ट अशी आहे की,’ कोमामधून बाहेर आल्यानंतर तो अचानक खूप चांगल्या पद्धतीने फ्रेंच बोलू लागला तसेच त्याला त्याच्या आयुष्यातील मागची १२ वर्षेदेखील आठवली नाहीत.

कर्टिस इंग्लंडमध्ये राहतो आणि १८ व्या शतकात त्याचे पूर्वज फ्रान्सच्या नॉर्मंडी भागात राहत असत, तरी त्यांच्या कुटुंबातील कोणालाही फ्रेंच भाषा बोलता येत नाही. कर्टिसची ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोक या घटनेला पूर्वजन्म आणि चमत्कारांसारख्या गोष्टींशी जोडत आहेत. कर्टिस म्हणतो की,’ त्याने कदाचित शाळेत कधीतरी फ्रेंच शिकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोमामधून उठल्यानंतर त्याने ही भाषा अगदी चांगल्या प्रकारे बोलण्यास सुरुवात केली, हे सर्व कोठून शिकले हेदेखील त्याला आठवत नाही.

फ्रेंच काही दिवसात विसरला
बीबीसीच्या वृत्तानुसार, कर्टिस कोमातून बरा होत असताना पुन्हा फ्रेंच बोलायला विसरला तेव्हा डॉक्टरांना मोठा धक्काच बसला. ऑगस्ट २०१४ मध्ये कर्टिसचा गंभीर अपघात झाला होता, त्यानंतर त्याला कारमधून बाहेर काढण्यासाठी ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला होता. त्याला बर्मिंघमच्या एका रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे तो ६ दिवस कोमामध्ये होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.