हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर, महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुन्हा खेळताना दिसलेला नाही. त्यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात स्थान दिलेलं नाही. विश्वचषकानंतर किमान वर्षभर तरी धोनी हा क्रिकेटच्या मैदानात उतरला नव्हता. मात्र आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धोनीचा फिटनेस आणि त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी का?? या विषयावर सतत चर्चा सुरु आहे. मात्र धोनी हा भारताचा आतापर्यंतचा सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे यात शंकाच नाही. धोनीचा चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकारी हरभजन सिंह याने धोनीच्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
“हे कर, ते करु नको असं धोनी तुम्हाला कधीच सांगणार नाही. तुम्ही जे करु शकता ते सर्वोत्तम करा अशी त्याची अपेक्षा असते. जर तुम्हाला सहाही चेंडू ऑफ स्फिन टाकता येत असतील तर तसे टाका. कित्येकदा त्याने मलाही यष्टींमागून काही सूचना केल्या आहेत. परंतू मी कशी गोलंदाजी करावी हे त्याने कधीच सांगितले नाही.” हरभजन सिंहने ESPNCricinfo या संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की. “एकदा पुण्यामध्ये सामना सुरु होता आणि शार्दुल ठाकूरला समोरचा फलंदाज चांगलाच चोप देत होता. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने सणसणीत षटकार ठोकले. हे पाहिल्यावर मी धोनीजवळ गेलो आणि त्याला म्हणालो,” तू त्याला काही सांगत का नाहीस?? चेंडूची दिशा बदल किंवा फिल्डरची जागा बदलायला सांग.” यावर धोनी मला म्हणाला,” हे बघ आता मी त्याला काही सांगायला गेलो तर तो गोंधळून जाईल, त्यापेक्षा त्याला मार खाऊ देत.”
हेच तर धोनीच्या कर्णधारपदाचे वैशिष्ट्य आहे. त्यावेळी आम्ही बाद फेरीत दाखल झालो होतो म्हणून शार्दुलने कशीही गोलंदाजी केली तरी आम्हाला काहीच फरक पडणार नव्हता. ज्यावेळी त्याला वाटेल की, आता त्याच्याकडे काहीच पर्याय उरला नाहीये, त्यावेळी मी त्याची मदत करेन, “असं धोनी मला म्हणाला होता. त्यामुळे जोपर्यंत तुमच्याजवळचे सर्व पर्याय संपत नाही तोपर्यंत धोनी तुम्हाला कर्णधार म्हणून काहीच मदत करत नाही. दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या स्थगित करण्यात आला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच या वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय सध्या करत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.