लग्नात नाचता नाचता अचानक गेला व्यक्तीचा जीव

Viral Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मृत्यू कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. हसताना, बोलताना, चालताना, नाचतानाही धडधाकट दिसणाऱ्या माणसाचा अचानक मृत्यू होऊ शकतो अशीच एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा नाचता नाचता मृत्यू झाला आहे. लग्नात नाचताना ही व्यक्ती अचानक कोसळली आणि त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा धक्कादायक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ एका लग्नाच्या पार्टीचा आहे. जिथं एक व्यक्ती दोन महिलांसोबत डान्स करत होती. पण काही क्षणातच हे आनंदाचं वातावरण शोकाकुल वातावरणात बदललं. कारण डान्सचा आनंद लुटणाऱ्या या काकांचा नाचता नाचता मृत्यू झाला आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) शशी कपूरचं बदन पे सितारे लपेटे हुए हे गाणं ऐकायला येतं आहे. ही व्यक्ती या गाण्याचा पुरेपूर आनंद घेते आहे. अगदी मन लावून या गाण्यावर डान्स करते. या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. त्यांचा डान्स पाहून तिथं असलेले लोकही त्यांना प्रोत्साहित करत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत.

यानंतर अचानक या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागतं. तिचा श्वास फुलू लागतो. त्यामुळे ती व्यक्ती डान्स करणे थांबवते आणि स्टेजवर बसते. तितक्यात त्यांच्यासोबत नाचणाऱ्यापैकी एक महिला त्यांना काय झालं म्हणून विचारायला जाते. काही कळायच्या आतच ते धाडकन स्टेजवर कोसळतात आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो. हा व्हिडीओ (Viral Video) कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. पण प्रतीक दुआ नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मृत्यूची काही वेळ नाही, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत.

हे पण वाचा :

ओबीसी आरक्षण जाण्यास मित्रपक्ष आणि केंद्राची चूक, काॅंग्रेसची नाही : भानुदास माळी

राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार

महाविकास आघाडीची युती बघायला मोठे साहेब असायला हवे होते; आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

बाथरूममध्ये आंघोळ करताना 13 वर्षाच्या मुलाचा शाॅक लागून मृत्यू

काँग्रेसला पुन्हा झटका : 50 वर्षांपासून पक्षात असलेल्या ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश