तुला कोणी सांगितलं की तू चांगला गायक आहेस? केआरके ने सलमानची उडवली अशी खिल्ली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरी असलेले कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी साधत आहेत. सलमान खान देखील वेगवेगळे व्हिडीओ, फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असतो. लॉकडाऊनदरम्यान त्याने एक गाणे गायले गाऊन ते सोशल मीडियावर टाकले आहे.

KRK diagnosed with stomach cancer; actor upset over 'unfulfilled ...

‘इमोशनली पास रहो, फिजिकली दूर रहो’, अशी ओळ देत त्यानं या गाण्याचा ऑडिओ शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांना हे गाणं आवडलं आहे. मात्र कर्कष आवाज असलेल्या सलमान तुला कोणी सांगितलं की तू चांगला गायक आहेस? ‘प्यार करोना सारखी गाणी गाणं थांबव आणि आमच्यावर कृपा कर. तू गाणं गातोस तेव्हा ड्रम फुटल्यासारखा आजाव येतो. तुझं गाणं ऐकूण पक्षी देखील उडून जातील’, असं म्हणत केआरकेनं सलमानची खिल्ली उडवली आहे. केआरके एक वादग्रस्त अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आता सलमानच्या या गाण्याची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान सलमान हा त्याचा वेळ कसा घालवतो. याबाबत तो सतत काही ना काही पोस्ट करत असतो. आता ही त्यानं असच करोनाच्या पार्श्वभूमीवर एक गाणं तयार केलं आहे. या गाण्याचा ऑडिओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र तो केआरके ला फारसा आवडला नाही असं दिसत आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.