कोका-कोलाने अचानक जगभरातील आपल्या जाहिरात थांबवण्याचे आदेश का दिले; घ्या जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि पुढील 30 दिवस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सर्व जाहिरातींचे पेमेंट थांबवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार जगभरात वर्णभेदाविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अधिकृतपणे या बहिष्कारामध्ये सामील होणार नाही. मात्र आम्ही आमच्या जाहिराती थांबवित आहोत.

हे प्रकरण नक्की काय आहे
माध्यमांच्या बातम्यांमधून असे सांगितले जात आहे की जगभरात आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या कोका कोला कंपनीने शुक्रवारी जाहीर केले की ते सोशल मीडियावर पुढील किमान 30 दिवस आपल्या जाहिरातीना स्थगित करत आहे. कारण कंपनीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्णद्वेषी सामग्रीचा कसा सामना करावा यावर काम करायचे आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर्णद्वेषी जाहिरातींना विरोध केला जात आहे. म्हणूनच कंपन्या त्यांच्या जाहिरातींना थांबवत आहेत आणि त्यांच्या ब्रँडचे नाव बदलण्यासही प्रवृत्त झाल्या आहेत.

का थांबवल्या जाहिराती
कोका-कोला कंपनीचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विनी यांनी थोडक्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जगात वर्णद्वेषाला कोणतेही स्थान नाही तसेच सोशल मीडियावरही वर्णद्वेषाला स्थान नाही. ते म्हणाले की सोशल मीडिया कंपन्या – ज्या इतर प्रमुख ब्रँडने बदलांसाठी आणि द्वेषयुक्त सामग्रीचा सामना करण्यासाठी बहिष्कार टाकला आहे, त्यांना अधिक जबाबदारी आणि पारदर्शकता स्वीकारण्याची आवश्यकता आहे. बेवरेज जायंट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोका-कोलाने नुकत्याच एका मुलाखतीत सीएनबीसीला सांगितले की, जाहिरात थांबवण्याचा अर्थ असा नाही की ते गेल्या आठवड्यात आफ्रिकन अमेरिकन नागरी गटांनी सुरू केलेल्या चळवळीत सामील होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.