आपल्या नवऱ्याचा पगार किती आहे याची माहिती पत्नी घेऊ शकते, कायद्याने दिला आहे ‘हा’ अधिकार*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । विवाहित असल्याने प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याच्या पगाराबद्दल माहिती जाणून घेण्याचा हक्क असतो. खासकरुन पोटगी मिळावी या उद्देशाने ती अशी माहिती घेऊ शकते. जर पत्नीची इच्छा असेल तर ती माहितीच्या अधिकारातूनही याबाबद्दलची माहिती मिळवू शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालय 2018 च्या आदेशानुसार पत्नी म्हणून विवाहित महिलेला आपल्या नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे.

फायनान्शिअल प्लॅनरची देखील घेऊ शकता मदत – एक विवाहित स्त्री असल्याने, स्वतःला आणि आपल्या मुलांसाठी खाणे, कपडे घालणे, जगणे आणि इतर मूलभूत गोष्टींचा महिलेस कायदेशीर हक्क आहे. अशा परिस्थितीत पत्नीला यासाठी आपल्या नवऱ्याकडे भीक मागण्याची गरज नाही कारण तिला कायद्याने हा अधिकार दिला आहे. याबद्दल पत्नी आपल्या पतीशी बोलू शकते. ती स्पष्ट करु शकते की, जर काही अप्रिय घडले तर ही माहिती आवश्यक आहे. जर नवरा हे करण्यास तयार नसेल तर तो मध्यस्थ किंवा फायनान्शिअल प्लॅनरची देखील मदत घेऊ शकतो. ते त्यांना पती-पत्नीमध्ये आर्थिक समस्या जाणून घेण्याचे महत्त्व सांगू शकतात.

आरटीआयद्वारेही तुम्हाला मिळू शकते माहिती – गुरुवारी केंद्रीय माहिती आयोगाने एका खटल्याची सुनावणी करताना हे सांगितले. या खटल्याची सुनावणी सुरू असताना माहिती आयोगाने माहिती न देण्याचा आदेश नाकारला. यासह जोधपूरच्या प्राप्तिकर विभागला महिलेला नवऱ्याच्या पगाराबद्दल 15 दिवसांत तपशील देण्यास सांगितले. कमिशनने सांगितले की, पत्नीला नवऱ्याच्या एकूण उत्पन्नाविषयी आणि करपात्र उत्पन्नाविषयी जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासह माहिती आयोगानेही अशी माहिती थर्ड पार्टीला दिली जाऊ शकत नाही आणि ती माहितीच्या अधिकारात येत नाही, असा युक्तिवादही नाकारला.

जोधपूर येथील महिला रहमत बानो यांच्या अपिलावर सुनावणी करताना माहिती आयोगाने हा आदेश दिला. यापूर्वी, माहिती आयोगाने असे म्हटले आहे की, सरकारी कर्मचार्‍यांच्या पत्नींना आपल्या नवऱ्याला किती पगार मिळतो हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. इतकेच नाही तर पतीला किती पगार मिळतो याची देखील तिला माहिती असायला हवी आणि नुसार ही माहिती सार्वजनिक केली जाऊ शकते.

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचाही हक्क असतो – कोर्टाने मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये बरोबरीचा अधिकार देखील दिला आहे. सुधारित हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत मुलींनाही मुलांसारखाच वाटा मिळेल, असे कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाचे म्हणणे आहे की, मुलगी विवाहित आहे की नाही त्याने काही फरक पडत नाही. ती मालमत्तेत समान वाटा घेऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.