बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने हत्या (Murder)केली आहे. पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या(Murder) केली आहे. आणि या सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या (Murder) करण्यात आरोपी पत्नीला तिच्याच अल्पवयीन मुलाने मदत केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येणार्या भुमराळा गावात एका महिलेने आपल्या मुलाच्या आणि प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आहे. आरोपी महिलेने आपला अल्पवयीन मुलगा आणि प्रियकर ज्ञानदेव आघाव या दोघांच्या मदतीने पती रामदास सरकटे यांची दोरीने गळा आवळून हत्या (Murder) केली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
आरोपी पत्नीने प्रियकर ज्ञानदेव आघाव याच्या साहाह्याने पती रामदास सरकटे यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी पतीचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकला. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा केवळ बारा तासांच्या आत छडा लावला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा :
काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स
सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त
…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका