पत्नी, मुलगा आणि मुलावर झाडली गोळी; CRPF च्या जवानांची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये धक्कादायक घटना घडली. जेथे एका सीआरपीएफच्या जवानाने आपली पत्नी आणि दोन मुलांवर गोळी झाडली. त्यानंतर या सीआरपीएफ जवानाने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. ही घटना थरवईच्या परिल्ला ग्रुप सेंटरची आहे. या घटनेची माहिती मिळताच छावणीत एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही तातडीने तिकडे आले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. विनोद असे या सीआरपीएफ जवानाचे नाव होते. त्याने आपली पत्नी विमला, मुलगा संदीप आणि मुलगी सिमरन यांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

त्याच वेळी, प्रयागराजमध्येच आणखी एका सामूहिक हत्याकांडाच्या घटनेची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये पीडित कुटुंबाला आपल्या घरातील मुलाच्या एका महिलेबरोबरील अवैध संबंधाचा विरोध करणे चांगलेच महागात पडले. चिडलेल्या या मुलाने नंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. आतापर्यंतच्या तपासात हे उघड झाले आहे की पीडित कुटूंबातील मुलगा हाच या खुनाचा सूत्रधार आहे.

इतकेच नाही तर त्या मुलाने आपल्या मित्राला ८ लाख रुपयांची सुपारी देऊन घरातील आई, वडील, बहीण आणि पत्नीची हत्या केली. या घटनेत पोलिसांनी आतिश आणि अनुज श्रीवास्तव यांना अटक केली. यातील आतिशने त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली आहे तर अन्य दोन आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे. धुमगंज पोलीस स्टेशन परिसरातील प्रीतम नगर भागात या घटनेनंतर दहशतीचे वातावरण झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.