हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र गेल्या काही दिवसात बिचुकले फारसे दिसले नाहीत. आता राज्यपालांना पत्र लिहून ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी पत्रातून विधानपरिषदेवर आमदार म्हणुन जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सतत वादातीत अभिजित बिचुकले यांना आता विधानपरिषदेवर आमदार म्हणून जाण्याची ईच्छा झाली आहे. आणि नेहमीप्रमाणे त्यांना याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. म्हणूनच त्यांनी वेळ न दवडता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून आपली ईच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. म्हणूनच कला विभागातून आपली विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड करावी असे त्यांनी राज्यपालांना या पत्रात लिहिले आहे.
कवी मनाचे अभिजित बिचुकले यांनी आपल्या मागणीचे पत्र राज्यपालांना पाठविले असले तरी प्रत्यक्ष राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी प्रथम मुख्यमंत्र्यांना अर्ज करावा लागतो. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांकडे शिफारस करतात. अशी प्रक्रिया असते. मात्र बिचुकलेनी थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे. आणि विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांवर टीकादेखील या पत्रात त्यांनी केली आहे. आता राज्यपाल या पत्राला काय उत्तर देतात याकडे नक्कीच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.