मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. या दौऱ्यात बुमराह भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा फास्ट बॉलर बनू शकतो. सध्या बुमराहच्या नावावर 19 टेस्टमध्ये 83 विकेट आहेत.
भारताकडून सगळ्यात जलद 100 विकेट घेण्याचा विक्रम फास्ट बॉलरमध्ये कपिल देव यांच्या नावावर आहे. त्यांनी 25 टेस्टमध्ये हि कामगिरी केली आहे. यानंतर इरफान पठाण, मोहम्मद शमी,इशांत शर्मा यांचा नंबर लागतो. त्यांना ही कामगिरी करायला अनुक्रमे 28,29,33 टेस्ट खेळाव्या लागल्या होत्या. 18 ते 22 जून रोजी भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर भारत-इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट होणार आहेत. अशा प्रकारे भारत इंग्लंड दौऱ्यात 6 टेस्ट खेळणार आहे. जर बुमराह पूर्णपणे फिट राहून जर या सगळ्या टेस्ट मॅच खेळला तर तो हा विक्रम सहज आपल्या नावावर करू शकतो.
टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद फास्ट विकेट घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॉर्ज लोहमॅनच्या नावावर आहे. लोहमॅननी 16 टेस्टमध्येच 100 विकेट घेतल्या होत्या. तर भारताकडून आर.अश्विन सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा बॉलर ठरला आहे. त्याने 18 मॅचमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत. यानंतर इरापल्ली प्रसन्न यांनी 20 टेस्टमध्ये, अनिल कुंबळेने 21 टेस्टमध्ये सुभाष गुप्ते यांनी 22 टेस्टमध्ये, बीएस चंद्रशेखर आणि प्रग्यान ओझा यांनी 22, विनू मंकड यांनी 23, रविंद्र जडेजाने 24 टेस्टमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत.