हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, आधी सरकारी असलेल्या परंतु आता खासगी बँक झालेल्या आयडीबीआय बँकेने आपल्या खातेदारांना ऑनलाइन फ्रॉड पासून वाचविण्यासाठी नुकताच एक अलर्ट पाठवला आहे. आयडीबीआय बँकेने आपल्या खातेधारकांना एक एसएमएस पाठविला आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की ज्या अज्ञात स्त्रोतांद्वारे कोविड -१९ बद्दल माहिती मागितली जात आहे त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. असे अनावश्यक असलेले कॉल आपल्या डिटेल्स चोरु शकतात आणि आपल्याला मोठा आर्थिक झटका देऊ शकतात. अशा परिस्थितीत खातेदारांनी अलर्ट आणि सुरक्षित असणे महत्वाचे आहे. कोविड -१९ च्या या महामारी मध्ये बँकिंगच्या फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली आहे. म्हणूनच सर्व बँका आपल्या ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी अॅलर्ट पाठवत असतात जेणेकरुन त्यांचे पैसे सुरक्षित राहतील.
आपल्या खातेधारकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये आयडीबीआय बँक म्हणते की, तुम्ही तुमचा कार्ड नंबर, कार्डची एक्स्पायरी डेट, सीव्हीव्ही, यूपीआय पिन, एम पिन , नेट बँकिंग पासवर्ड हे कोणत्याही अनावश्यक कॉल, एसएमएस, आयव्हीआर, लिंक किंवा ईमेल यांवर शेअर करू नका. गुन्हेगार आपले कार्ड अॅक्टिवेशन, कार्ड अपग्रेड, इनकम टॅक्स रिफंड,रिवार्ड पॉईंट्स रिडेम्पशन किंवा कोविड -१९ या साथीच्या नावावर आपली माहिती विचारतात असे झाल्यास आपली माहिती त्यांना देऊ नका. सावध रहा, सुरक्षित रहा.
बचत खात्यावर व्याज दर कमी केला
आयडीबीआयने या महिन्यात आपल्या बचत खात्यावरील व्याज दरात कपात केलेली आहे. बँकेने आपल्या बचत बँक खात्यातील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी घट केली आहे.
नवीन मार्गाने चोरत आहेत पैसे
अलीकडेच एसबीआयने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगसाठी स्ट्रॉंग पासवर्ड तयार करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने ट्विटद्वारे पासवर्ड स्ट्रॉंग ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने ग्राहकांना त्यांचा पासवर्ड सतत अपडेट करण्यास सांगितले आहे. आपल्या ट्वीटच्या माध्यमातून एसबीआयने स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवावा हे शिकवले आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांची नावे न ठेवण्याची काळजी घ्यायलाही सांगितले, कारण यामुळे तुमच्या खात्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो तसेच हॅकर्सना अश्या प्रकारच्या पासवर्डचा अंदाज लावणेही सोपे जाते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.