हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी खासगी क्षेत्रातील येस बँकेने डिजिटल बचत खाते सुरू केले आहे. शुक्रवारी बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही सेवा सुरू झाल्यास ग्राहकाने बँकेत जाऊन प्रत्यक्ष स्वरुपात कागदपत्र सादर करण्याची किंवा बचत खाते उघडण्यासाठी कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधण्याची गरज भासणार नाही. हे खाते ई-केवायसी आणि व्हिडिओ वेरिफिकेशन द्वारे उघडले जाऊ शकते.
बँक म्हणाले की, हे डिजिटल सेव्हिंग खाते व्हर्च्युअल डेबिट कार्डसह येते, ज्याच्या मदतीने ग्राहकांना 100 हून अधिक सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये बँकेच्या अॅप किंवा वेबसाइटद्वारे ट्रान्सझॅक्शन, फ़ंड ट्रान्सफर आणि ऑनलाइन शॉपिंगचा समावेश आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली कोणतीही व्यक्ती या पोर्टलद्वारे आपले डिजिटल सेव्हिंग अकाउंट उघडू शकते.
या पद्धतीने अकाउंट उघडा
या ऑनलाइन फॉर्ममध्ये आधार, पॅन, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर भरा. आता ओटीपीसह डिटेल्स भरा, त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती वेरिफाय करा आणि अकाउंटशी संबंधित माहिती भरा. अकाउंट नंबर, कस्टमर आयडी सबमिट केल्यानंतर अकाउंटला अॅक्टिवेट करण्यासाठी बँकेकडून व्हिडिओ कॉलमध्ये ऑरिजनल डॉक्यूमेंट्स दाखवा.
डिजिटल सेविंग्स अकाउंटच्या सुविधा
>> आधार कार्ड वापरुन डिजिटल खाते उघडणे.
>> व्हर्च्युअल डेबिट कार्ड जे ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते.
>> एनईएफटी, आरटीजीएस आणि यूपीआय सुविधा.
>> मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग आणि फोन बँकिंग सुविधा.
>> त्वरित लाभार्थी आणि बिलर नोंदणी.
>> डेबिट कार्डवरील ऑफरचा लाभ घेऊन ग्राहक डिजिटल सेव्हिंग खात्यासाठी रिवॉर्ड पॉईंट्स मिळवू शकतात.
>> या खात्यावर 6% वार्षिक व्याज मिळेल.
>> या सेविंग्स अकाउंटसाठी सरासरी १०,००० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे.
>> कॉर्पोरेट सॅलरी अकाउंटसाठी सरासरी मासिक शिल्लक राखण्याची गरज नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.