दुबई । संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) कार्यरत असणाऱ्या लाखो भारतीयांसाठी (Indians) आनंदाची बातमी आहे. युएईने शनिवारी जाहीर केले की, ते व्यावसायिक विदेशी नागरिकांना आपले नागरिकत्व (Citizenship) देईल. कोविड -१९ साथीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. खास बाब म्हणजे येथे काम करणाऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही हे नागरिकत्व दिले जाईल.
दुबईचे राज्यकर्ते, पंतप्रधान आणि देशाचे उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन अल मकतूम यांनी अशी घोषणा केली की,”कलाकार, लेखक, डॉक्टर, अभियंता आणि वैज्ञानिक तसेच त्यांचे कुटुंबीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. युएईचे नागरिक झाल्यानंतरही ते त्यांचे जुने नागरिकत्व राखू शकतील.”
कोणते अधिकार मिळतील
तथापि, नागरिकत्व मिळविणार्या परदेशी नागरिकांना येथील मूळ नागरिकांसारखेच हक्क दिले जातील का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत येथे काम करणाऱ्या परदेशी नागरिकांना केवळ नोकरी किंवा कामाच्या दरम्यानचा व्हिसा मिळतो, जो रिन्यु होतो. मात्र, अलिकडच्या वर्षांत व्हिसा साठीचे अनेक नियम शिथिल केले गेले आहेत, ज्यामुळे खास गुंतवणूकदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक अधिक काळ देशात राहू शकतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.