मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला अधिकच महत्व प्राप्त झालं आहे. भाजपने विरोधकांच्या प्रचाराची धार कमी करण्यासाठीच हे केल की काय अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागल्या आहेत.
त्याच त्यांदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर कडाडून टीका केली असून, शरद पवारांचे चारित्र्य हनन करून त्यांना सत्तेपर्यंत पोहचता येईल अशी सुरवातीपासूनच भाजपची धारणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच बरोबर बँक घोटाळ्यात ईडी कसा काय गुन्हा दाखल करू शकते असा प्रश्न ही उपस्थित केला.
आव्हाडांच्या या टीकेनंतर आता भाजप काय प्रतिक्रिया देते यांवर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आव्हाड यांच्या टिकेबरोबरच शरद पवार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हयाचा निषेध बारामतीत बारामती बंद ची हाक दिली असून. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन आणि निषेध व्यक्त केला जात आहे.