बेरोजगारांना मोदी सरकारची भेट! आता 3 महिन्यांसाठी दिला जाईल अर्धा पगार, तुम्हालाही याचा कसा फायदा होईल ‘हे’ जाणून घ्या*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या काळात मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या. पगाराअभावी कोट्यवधी लोकांना उपजीविकेबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने या सर्व बेरोजगारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आणली आहे. या कोरोना कालावधीत जर कोणी बेरोजगार असेल तर त्याला बेरोजगारी भत्ता मिळेल. या योजनेचा फायदा घेण्यास आपण कसे सक्षम होऊ शकता हे जाणून घेउयात …

या योजनेचा लाभ कामगार कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत रजिस्टर्ड असलेल्यांना देण्यात येईल. कामगारांच्या हितासाठी ESIC द्वारे संचालित अटल विमा व्यक्ती कल्याण योजना 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली. या कल्याणकारी योजनेंतर्गत बेरोजगार भत्ता उपलब्ध आहे.

‘या’ अटी आहेतः किमान दोन वर्षे ESIC योजनेशी संबंधित असलेल्या कामगारांनाच हे पैसे मिळतील. याचा अर्थ असा आहे की केवळ 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2020 पर्यंत या योजनेशी संलग्न राहिलेले कामगार. या कालावधीत 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत किमान 78 दिवस काम करणे आवश्यक आहे.

तीन महिन्यांसाठी दिला जाईल अर्धा पगार : कोणताही बेरोजगार व्यक्ती जास्तीत जास्त 90 दिवस (तीन महिने) हा भत्ता घेऊ शकतो. तो तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के क्लेम करू शकतो. पूर्वी ही मर्यादा 25 टक्के होती. आणखी एक नियम बदलण्यात आला आहे. पूर्वी 90 दिवस बेरोजगार राहिल्यानंतर याचा फायदा घेऊ शकत होतो. सध्या ते कमी करून 30 दिवस केले आहे. कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे

कोणत्या लोकांना ESIC योजनेचा लाभ मिळतो? एका मर्यादेपर्यंत कमाई करणार्‍या कामगारांसाठीच ही ESIC योजना उपलब्ध आहे. ज्या कारखान्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असतील तेथे ही योजना लागू आहे. जर त्यांचा पगार 21 हजारांपर्यंत असेल तर ही योजना लागू होईल. देशातील सुमारे साडेतीन कोटी कुटुंब युनिट हे ESIC अंतर्गत येतात, ज्यामुळे सुमारे 135 दशलक्ष लोकांना कॅश आणि मेडिकल बेनिफिट मिळतो.

कामगार स्वत: क्लेम करू शकतीलः मंडळाच्या निर्णयानुसार आता मालकांकडून कामगारांचा क्लेम दाखल करण्याची गरज भासणार नाही. बैठकीच्या अजेंड्यानुसार, हा क्लेम थेट ESIC च्या शाखा कार्यालयात सादर केला जाऊ शकतो आणि केवळ शाखा कार्यालय स्तरावर नियोक्ताद्वारे क्लेमची पडताळणी केली जाईल. यानंतर, क्लेमची रक्कम थेट कामगारांच्या खात्यावर पाठविली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.