मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली. राऊत यांच्यासोबत तासभर दरवाजा बंद चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत मोठे विधान केले आहे.
शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावं असं मत पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. तसेच जनतेने आम्हाला विरोधीपक्षात बसवलं असून आम्ही विरोधीपक्षाची भुमिका योग्य पद्धतीने पार पाडू असंही पवार म्हणालेत.
आपण मुख्यमंत्री होण्यास तयार होता काय असं एका पत्रकाराने विचारले असता मी चार वेळा मुख्यमंत्री राहिलो आहे. आता मला मुख्यमंत्री करा यासाठी मी कधीही आग्रही नव्हतो असं म्हणत या चर्चा म्हणजे प्रपोगंडा आहेत असे पवार म्हणाले.