स्वित्झर्लंड मध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 16 लोकांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बर्न । स्वित्झर्लंडमध्ये कोरोना विषाणू (Covid-19) पासून बचावासाठीची लस घेतल्यानंतर कमीतकमी 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. वैद्यकीय उत्पादनांच्या एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की,”आम्हाला औषधांच्या संशयास्पद प्रतिक्रियांच्या 364 प्रकरणांची माहिती मिळाली आहे, त्यापैकी 199 फाइझर आणि बायोएन्टेक संबंधित आहेत तर मॉडर्नच्या औषधाशी संबंधित 154 प्रकरणे आहेत.

एजन्सीने सांगितले की, “लसीकरणानंतर वेगवेगळ्या वेळी 16 जणांचा मृत्यू झाला. ठार झालेल्यांचे सरासरी वय हे 86 वर्ष इतके होते आणि त्यातील बहुतेकांची प्रकृती आधीच गंभीर अवस्थेत होती. “एजन्सीने म्हटले आहे की,” या अभ्यासामध्ये लोकांचा मृत्यू लसीमुळे झाला नसल्याचे आढळले आहे.”

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जगात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण लोकांची संख्या 113,544,338 वर पोहोचली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत 2,519,255 लोकं मरण पावले आहेत. जगभरात कोरोना विषाणूची लागण झालेली 89,129,051 लोकं बरे झाले आहेत. अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत संसर्गाची एकूण प्रकरणे सुमारे 2.90 कोटी पर्यंत पोहोचली आहेत. तर आत्तापर्यंत 520,785 लोकांचा त्या ठिकाणी बळी गेला आहे. सध्या जगात कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 21,896,032 वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment