पश्चिम बंगाल मध्ये रिअ‍ॅलिटी शोच्या चित्रीकरणास परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरात सुरु असणाऱ्या कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली होती. उद्योगधंद्यांसोबत मालिका, रिऍलिटी शोच्या चित्रीकरणाला देखील बंदी कऱण्यात आली होती. आता ठिकठिकाणी मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. राज्यांनी आता चित्रीकरणास सुरुवात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मालिकांचे जुने भाग न लागता नवीन भाग लागणार आहेत. पश्चिम बंगालमध्येही आता रिऍलिटी शोच्या चित्रीकरणास परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे की, राज्यात आता रिऍलिटी शोचे चित्रीकरण करता येऊ शकेल. पण हे चित्रीकरण प्रेक्षकांशिवाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे चित्रीकरण करत असताना सामाजिक अलगाव चे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच केवळ ४० क्रू सभासदांसोबत हे चित्रीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

देशभरात सर्वच मालिकांचे चित्रीकरण बंद पडले होते. सर्व मालिकांची कथा थांबली होती. आता या कथा पुढे सरकरणार आहेत. सर्व नियम पाळत चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. या महिन्यापासून मालिकांचे पुढील नवीन भाग पाहावयास मिळणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.