हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 जुलैपासून बँकिंगचे अनेक नियम बदलणार आहेत. आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे. 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठीचे नियमही आता बदलणार आहेत. ज्यामध्ये Loan Moretorium, बचत खात्यात Minimum Balance काढून टाकणे यासारख्या गोष्टी समाविष्ट आहेत. आता बँका 30 जूनपासून हे सर्व नियम बदलणार आहेत. अशा परिस्थितीत, कोणत्या गोष्टी बदलत आहेत हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे कारण एक छोटीशी चूक आपल्याला महाग पडू शकते.
पीएनबी बचत खात्यातील व्याज कमी करत आहे
पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) बचत खात्यावरील व्याज दरात 0.50 टक्क्यांनी कपात केली आहे. 1 जुलैपासून बँकेच्या बचत खात्यास वार्षिक जास्तीत जास्त 3.25 टक्के व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यात 50 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक रकमेवर वार्षिक 3% आणि 50 लाखांपेक्षा जास्त रकमेवर वार्षिक 3.25 टक्के व्याज दिले जाईल. यापूर्वी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेनेही आपल्या बचतीवरील व्याज दरात कपात केली होती.
१ जुलैपासून एटीएममधून रोख पैसे काढण्याचे नियम बदलतील
लॉकडाऊन आणि कोरोनामुळे एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले जात आहेत, जे तुमच्या खिशावरील भार वाढवतील. आता 1 जुलैपासून एटीएममधून पैसे काढणे आपल्यासाठी महाग होणार आहे. एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी वित्त मंत्रालयाने सर्व ट्रान्झॅक्शन चार्जेस मागे घेतले होते. एटीएम ट्रान्झॅक्शन चार्जेस तीन महिन्यांपर्यंत कमी करून कोरोना संकटाच्या काळात लोकांना सरकारने मोठा दिलासा दिला होता. मात्र ही सूट केवळ तीन महिन्यांसाठीच देण्यात आली होती, जी 30 जून 2020 रोजी संपणार आहे.
सरासरी किमान शिल्लक राखण्यासाठी मुदत
कोरोना काळात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते की कोणत्याही बँकेच्या बचत खात्यात सरासरी किमान शिल्लक ठेवणे जरुरीचे राहणार नाही. एप्रिल ते जून या काळासाठी हा आदेश लागू करण्यात आलेला होता. अशा परिस्थितीत आपल्या खात्यात किमान शिल्लक नसतानाही लोकांना कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागला नाही. मात्र आता या निर्णयाची मुदत ही 30 जून रोजी संपुष्टात येणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.