अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई |
अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्या व काकडा गावात मुंबईहून दिनांक २६ मे रोजी आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. विशेष म्हणजे या युवकामधे कोणतेही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र तरीही याचा थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना सकारात्मक आल्याने आता चींता व्यक्त होत आहे.
संबधीत युवक हा मुंबईहून गावात येताच त्याला संस्थात्मक वीलीगीकरन कक्ष बुरळघाट येथेच ठेवल्याने कोनीही गावातील व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊ शकले नाही. अन्यथा अधीक बाधीत होऊ शकले असते अशी माहीती अचलपूर चे तहसीलदार मदन जाधव यांनी दीली. मुंबईहून दी. २६ मे ला हा युवक त्याच्या ५ मित्रांसोबत खाजगी वाहनाने आलेला होता. मात्र प्रशासनाने गावात येताच या युवकाला विलीगीकरन कक्षामधे १४ दीवस थाबन्यासाठी सांगीतले आहे . मात्र काही पारीवार बाहेरहुन आलेल्या आपल्या पाल्यांना कीवा संबंधीतांना विलगीकरनात ठेऊ नये असा आग्रह करतात. जर असे झाल्यास कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपर्कातील परीवाराला लागण होऊ शकते . त्यामुळे कोनीही बाहेरील आलेल्या व्यक्तिंना घरामधे न ठेवता संस्थात्मक विलीगीकरनात ठेवनेच योग्य असते असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केलेले आहे.
युवकाच्या संपर्कात आणखी कोणी आलेला आहे का यासाठी विचारपूस सुरू असुन संबधीत परीसर आधीच सील करण्यात आलेला आहे. तर सपुर्ण परीसरावर प्रशासनाची नजर आहे. मात्र अचलपूर शहरामधे काही नागरीक नियमांचे पालन करत नसल्याचे दीसत आहे. ते अत्यंत धोकादायक आहे असे तहसीलदारांनी सांगीतले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.