हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या सतीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना आता महागाईचा सामना करावा लागू शकतो. त्याचा परिणाम हा आगामी काळात आपल्या स्वयंपाकघरात दिसून येईल, यामुळे आपले महिन्याचे बजेटही खराब होऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार भारत सरकार आता खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्यावर विचार करीत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कॅन्टीन उघडल्यानंतर फळ तसेच भाज्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.
काही काळापूर्वीच मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत असे जाहीर केले आणि ते वाढविण्यावर भर दिला. आता आयात शुल्कात वाढ करून देशातील तेलबियांचे उत्पादन वाढविणे हे भारत सरकारचे पुढील उद्दीष्ट आहे. आपला देश खाद्यतेलांच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे. कारण यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, देशातील रोजगाराच्या संधी वाढतील तसेच देशाचे आयात शुल्कही कमी होईल.
सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) चे व्यवस्थापकीय संचालक बी.सी. व्ही. मेहता यांनी याविषयी माध्यमांना सांगितले की, खाद्यतेलाच्या आयातीला आळा घालण्यासाठी आणि देशात तेलबियांचे उद्योग वाढविण्यासाठी सरकारने सल्ला मागितला आहे. आम्ही तेलबिया उत्पादन वाढविण्यासाठी अनेक सूचना दिल्या आहेत.
सरकारच्या योजना राबविणाऱ्या स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर देशाने मलेशियाकडून पाम तेलाची आयात केली, आणि सरकारने त्यावरील कर वाढविला तर किंमती वाढल्यामुळे त्याची आयात कमी होईल. ज्यामुळे मोहरी, सोयाबीन आणि शेंगदाणा तेलबियांची मागणी वाढेल आणि हि मागणी वाढताच त्याचे उत्पादन वाढेल. तसेच या करातून येणाऱ्या पैशाचा वापर देशातील तेलबियांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
आणखी एक सरकारी अधिकारी म्हणाले की,’ या करात पाच टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. भारत प्रत्येक तेलाच्या आयातीवर इतके अब्ज डॉलर्स खर्च करतो – सरकार असे म्हणतात की,’ गेल्या काही वर्षांत देशात खाद्यतेलांची आयात वाढली आहे. देशात खाद्यतेलाच्या एकूण वापरापैकी सुमारे ७० टक्के तेल हे आयात केले जाते. ज्यावर वर्षाकाठी सुमारे १० अब्ज डॉलर्स खर्च होतात. दुसरीकडे जर आपण कराबद्दल बोललो तर भारतातील क्रूड मोहरी तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल यांच्या कच्च्या तेलावर सुमारे ३५ टक्के आयात शुल्क आकारले जाते. रिफाईंड पाम तेलावर ३७.५ टक्के तर रिफाइंड तेलावर ४५ टक्के आयात शुल्क लागू आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.