हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोना संकटात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा एकमेव पर्याय लोक निवडत आहेत. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होते आहे. मार्केट तज्ञ या वेळी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण सोन्याचे यावर्षीचे दर ६०,०००रुपये प्रति १० ग्रॅम पार करू शकतात. सराफा बाजारात आता सोन्याचे दर ५०,०००रु प्रति १० ग्रॅम गेले आहेत. अशातही आपल्याकडे ४८,०००रु प्रति १० ग्रॅम सोने खरेदीची संधी आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम मध्ये आपण ४८५२ रुपये प्रति १० ग्रॅम गुंतवणूक करू शकता. याचा अर्थ असा आहे की, जर १० ग्रॅम सोने हवे असेल तर ४८,५२०रु खर्च करावे लागतील. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम में सोना मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यावरकरामध्ये सूट मिळते. या स्कीम अंतर्गत सोने खरेदीचे काही नियम आहेत. कोणीही व्यक्ती एका वित्तीय वर्षात अधिकतर ५०० ग्रॅम सोने खरेदी करू शकतो.
या बॉन्ड मध्ये कमीतकमी १ ग्रॅम सोने गुंतवता येते. यातील गुंतवणूकदारांना टॅक्स मध्ये सूट मिळते. गुंतवणूकदार या स्कीम द्वारे बँकेतून कर्ज देखील घेऊ शकतात. या गुंतवणुकीत खरेदी केलेल्या सोन्यावर दरवर्षी अडीच टक्के व्याजदेखील मिळते हे या स्कीमचे वैशिष्ट्य आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.