तामिळनाडू | आजचा काळ हा आधुनिक काळ समजला जातो. या आधुनिक काळातही काही लोक जात आणि धर्म सोडायला तयार नसतात. रोजच्या बोलण्यात आणि वागण्यात याचा उल्लेख आढळतो. या जात, धर्माच्या पलीकडे एक उदाहरण सद्ध्या समोर आला आहे. तामिळनाडूच्या एम. ए. स्नेहा यांनी जात आणि धर्म यांच्या त्याग केला आहे.
तामिळनाडूच्या 35 वर्षीय महिला वकील एम. ए. स्नेहा यांनी जात आणि धर्माचा त्याग केला आहे. त्या आता देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत ज्यांनी जात आणि धर्माचा त्याग केला आहे. त्या पेशाने वकील असून त्यांनी जन्मदाखल्यावर जात आणि धर्माचा रकाना रिक्त ठेवला आहे.
स्नेहा यांना तामिळनाडू सरकारने एक प्रमाणपत्र दिले आहे. या प्रमाणपत्रामध्ये त्यांना शासनाने म्हटले आहे की, ‘ त्या जात आणि धर्मापासून पूर्णतः मोकळ्या आहेत. सध्या जात आणि धर्म नाकारणाऱ्या त्या देशातील पहिल्या व्यक्ती आहेत. यामुळे त्याचा आदर्श अनेक ठिकाणी घेतला जाईल अशी चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”