कौतुकास्पद !! अंगावरच्या साड्या काढून त्यांनी वाचवले बुडणाऱ्या तरुणाचे प्राण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकांनी महिलांच्या धाडसाचा बातम्या ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील . अनेकींनी आपल्या धाडसाने प्राण वाचवले आहेत. अशीच काहीशी घटना ६ ऑगस्ट रोजी तामिळनाडू येथे घडली . तेथून जात असलेल्या महिलांनी प्रसंगावधान दाखवून पाण्यात बुडणाऱ्या दोन तरुणांना वाचविले.

इंडियन एक्सप्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार हि घटना तामिळनाडू येथील आहे. सेथमीज सेल्वी वय ३८ , मुथमल वय ३४ , अनंतवली वय ३४ वर्षे या तिघींची मिळून त्या मुलांचे प्राण वाचविले आहेत. तामिळनाडू येथील सिरावांचूर गावातील काही मुले मिळून क्रिकेट खेळण्यासाठी कोट्टाराई येथे गेले होते. मुलं खेळून झाल्यानंतर कोट्टाराई येथील धरणामध्ये पोहायला गेले होते. त्यातील चारही मुलांचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडू लागली तेथून काही महिला जात होत्या . त्यांनी प्रसंगावधान दाखवून पटपट आपल्या साड्या पाण्यात फेकून दोन मुलांचा जीव वाचवला. गेल्या आठवड्यात तामिळनाडू येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता . त्यामुळे त्या भागात पाण्याची पातळी वाढली होती. पाण्याची पातळी १५ ते २० फुटापर्यंत पोहचली होती.

 

सेथमीज यांना प्रतिक्रिया विचारली असता. त्या म्हणाल्या कि, हि मुलं ज्यावेळी पाण्याकडे जात होती. त्यावेळी आम्ही त्यांना पाण्याच्या पातळीचा इशारा दिला होता. त्यानंतर काही वेळातच मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी आम्ही पाण्याकडे धाव घेतली. आणि अंगावरच्या साड्या पटापट पाण्यात टाकल्या. चार मुलांपैकी दोन मुलांना वाचविण्यात आम्हाला यश आले. परंतु दोन मुलांना वाचविण्यात यश आलं नाही. याच दुःख आहे. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या मुलांना वाचवण्यासाठी आम्ही पाण्यात गेलो पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जी मुलं पाण्यात बुडाली त्यांचं वय हे साधारण १७ आणि २५ वय होत त्यातील एक शिकाऊ डॉक्टर होता. आरोग्य विभागाचे कर्मचारी या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

You might also like