अहमदाबाद सील; भाजपने केरळ, दिल्ली सरकारला मागितली मदत..हे कसले गुजरात माॅडेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । गेल्या सहा दिवसांत गुजरातमध्ये १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू हे गेल्या सहा दिवसांतील आहेत.त्यामुळे झालेल्या एकूण मृत्यूची संख्या ही ६ मे रोजी ३९६ वर पोहचली आहे अशातच केंद्र सरकार आणि माध्यमांचे लक्ष हे सातत्याने बंगालवर केंद्रित झाले होते.

जर आपण गेल्या काही दिवसांपासून टीव्ही चॅनेलवरच्या बातम्या काळजीपूर्वक पाहत असाल तर आपल्याला हे जाणवेल की बंगालमध्ये कोरोनाशी सामना करण्यास ममता बॅनर्जी यांचे सरकार कसे अपयशी ठरले आहे हेच अगदी ठळकपणे दाखविण्यात येत होते. परंतु त्याच्या तुलनेत गुजरातमधील अहमदाबादच्या परिस्थितीबद्दल मात्र कोणीही काहीही सांगण्यास तयार नव्हते.

Total lockdown in Ahmedabad to curb Corona spread - The Financial ...

आज अहमदाबादची परिस्थिती अशी आहे की रुग्णालयात येण्याच्या ३० मिनिटांतच बरेच रुग्ण हे मृत्युमुखी पडत आहेत.अशा परिस्थितीमुळेच औषधे आणि दूध वगळता परिसरातील इतर सर्व दुकाने ही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय काल रात्री घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील बातम्यांचा शोध घेतल्यास अहमदाबाद महानगरपालिकेला यासाठी जबाबदार धरले जात आहे.अहमदाबाद महानगरपालिकेच्या निर्णयानंतरही जिल्ह्यातील लोकं सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास विसरले आहेत आणि दुकानांवर प्रचंड प्रमाणावर गर्दी करत आहेत. लोक सर्व काही व्यवस्थित झाल्यासारखे रस्त्यावर फिरत आहेत.

Corona, Gujarat, Crosses 2000 Positive Cases, Ahmedabad - Corona ...

ही संपूर्ण चूक ‘अहमदाबाद महानगरपालिकेनेच केलेली आहे तसेच केंद्रातील मोदी सरकारची आणि राज्यातील भाजपा सरकारची यात कोणतीही चूक नाही, अशाच पद्धतीने बातमी वेबसाइटवर सादर केली जात आहे.होम डिलिव्हरी, स्विगी आणि झोमॅटो यासारख्या सेवांवरही बंदी घातली गेली आहे, परंतु आतापर्यंत या सेवा कशा कार्यरत होत्या याबाबदल न्यूज चॅनेल्सही आता सांगत आहेत.

अहमदाबादची परिस्थिती इतकी बिकट आहे की या संपूर्ण शहर हे कोरोनाव्हायरसच्या जखडत अडकले आहे.येथे आतापर्यंत कोरोनाचे ४ हजार ७४६ रुग्ण समोर आले आहेत, अहमदाबादमधील संसर्गाचे हे प्रमाण राष्ट्रीय दरापेक्षा दुप्पट आहे.शहरात सुमारे २० हजार लोकांना क्वारंटाईन ठेवले आहे तर २९८ लोक मरण पावले आहेत. शहरातील १००० खाटांची क्षमता असणारी ९ खाजगी रुग्णालयेही ताब्यात घेण्यात असून सर्व खासगी दवाखाने, नर्सिंग होम तसेच रुग्णालये हे पुढील ४८ तासात उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि तसे न केल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील असेही या आदेशात सांगण्यात आले आहे.

Ahmedabad crosses 250 cases, most from clusters | Ahmedabad News ...

गुजरातमधील एकूण प्रकरणांपैकी ७० टक्के प्रकरणे ही एकट्या अहमदाबादमधील आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरात सगळीकडे जवळपास कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.शहरात निमलष्करी दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. अहमदाबादमध्ये निमलष्करी दलाच्या ३८ कंपन्या रस्त्यावर गस्त घालत आहेत. त्यापैकी ४ बीएसएफ तर १ सीआयएसएफ कंपनी या केंद्राने पाठविल्या आहेत.

इकडे स्थिती इतकी बिकट झालेली आहे की दिल्ली येथील एम्स रुग्णालयातील तीन तंज्ञाना लवकरच अहमदाबादला विशेष विमानाने पाठविण्याची तयारी केली जात आहे.अशा वाईट परिस्थितीत गुजरातला ढकलणे हि केवळ आणि केवळ भाजपाच्याच राज्य व केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे असे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.