मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याच मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे (ambadas danve) शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.जर या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास काही लोक सोडून जातील अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याचे टोला अंबादास दानवे (ambadas danve) यांनी लगावला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
जर आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर लोक सोडून जातील अशी भीती सरकारला वाटत आहे. त्यांनी अनेकांना शब्द दिला आहे. एवढ्या लोकांना दिलेला शद्ब पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर काहीजण सोडून जातील या भीतीनेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचे अंबादास दानवे (ambadas danve) म्हणाले आहेत.
विरोधकांची टीका
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांच्यासोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारालाच मंत्रिपद हवं आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. तसेच जोपर्यंत बहुमत आहे, तोपर्यंत सरकार सत्तेत राहील अशी टीका अजित पवारांनी केली आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती