पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून शाइफेक करण्यात आली. तरीदेखील चंद्रकांत पाटील भीक या शब्दावर ठाम आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी चंद्रकांत पाटील तसेच भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाइफेकीच्या प्रकारानंतर देखील चंद्रकांत पाटील भीक या शब्दावर ठाम आहेत. मग त्यांनी मताची भीक मागितली का किंवा मंत्री पदाची भीक मागितली, असं म्हटल्यावर भारतीय जनता पार्टीला चालेल का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी यावेळी केला आहे.
अजित पवारांचीही टीका
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘सारखं काही ना काही चुकीचं बोलतात, महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. कोणी सांगितलं तुम्हाला भीक मागितली म्हणून? आम्ही जर भिकारड्यासारखं बोलतो, असं म्हटलं तर काय वाटेल तुम्हाला? पण आम्ही असं बोलणार नाही,’ अशी अजित पवारांनी केली आहे.
हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..