“मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या”; अनिल बोंडे यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्या वतीने राज्यात सध्या अनेकांवर कारवाई केली जात आहे. नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली आहे. यावरून आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते अनिल बोंडे यांनी “मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या ईडीच्यावतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात आघाडी सरकारची अवस्था बिकट आहे. राज्य सरकार केव्हा पडेल हे सांगू शकत नाही. पण लोकांना आता हे सरकार नको आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलेल्या पापाचे भुतं शांतपणे झोपू देत नाही.

संजय राऊत यांच्याकडे ईओडब्लू आहे. त्यांनी आरोप केले त्यावर काहीही कारवाई झाली नाही. हे सरकार ताबोडतोब पडावे, असे लोकांनाच वाटते. सरकार पडलं तर लोकं सुटकेचा श्वास घेतील. राऊत हे नागपुरात अस्वस्थ वाटले. चेहराही पडलेला दिसला. याचं कारण सावजी रस्स्याची कमाल तर नाही, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला आहे कि काय? असा सवाल करीत बोंडे यांनी राऊतांवर निशाणा साधला.

Leave a Comment