आता मोजता मोजताच नोटा होतील सॅनिटाइज; विद्यार्थ्यांनी बनवले ‘हे’ खास मशिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, आज सर्वकाही सॅनिटाईज केले जात आहे. स्वच्छतेच्या या काळात एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की त्यांनी असे एक मशीन तयार केले आहे जे केवळ नोटांना मोजतच नाही तर त्यांना सॅनिटाईजही करते. हे मशीन बनवणारे विद्यार्थी, अनुज शर्मा आणि त्याची टीम असा दावा करते की, या नोटा सॅनिटाईज करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या मशीनसाठी केवळ 14 ते 15 हजार रुपये खर्च करावे लागतात.

या मशीनच्या फोटोमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की या मशीनमध्ये एक विशेष सॅनिटायझर लावलेला आहे. जे साफ-सफाईला विचारात घेऊन पैसे मोजू शकतात. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की कोरोना विषाणूच्या या साथीच्या काळात लोकांच्या सुरक्षेचा विचार करता असे मशीन बनवले गेले आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना मशीन बनवणाऱ्या अनुज शर्मा या विद्यार्थ्याने सांगितले की, या मशीनमध्ये एका मिनिटात 200 नोटा मोजण्याची क्षमता आहे.

 

सोशल मीडियावर या विशिष्ट मशीनचा फोटो आल्यापासून ते लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरतो आहे. लोक या नोट सॅनिटायझिंग मशीनचे कौतुक करत आहेत. सोशल मीडिया यूजर अनुज शर्मा आणि त्यांच्या एपीजे अब्दुल कलाम या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या टीमचेही अभिनंदन करताना दिसतात. वृत्तसंस्थेने केलेल्या या ट्विटवर आतापर्यंत 400 हून अधिक लाईक्स आणि 50 रिट्वीट मिळालेले आहेत. एवढेच नाही तर लोक या पोस्टच्या खाली कमेंट करत आहेत.

 

 

एका युझरने कमेंट केली आणि लिहिले, “मस्त, आणखी एका युझरने टिप्पणी दिली … ही एक उत्तम काम आहे”.

 

ट्विटर यूजर्स सूरज दुबे यांनी हे मशीन पाहिल्यानंतर सांगितले की, गरज ही शोधाची जननी आहे आणि या मुलांनी हे सिद्ध केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment