हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी 26 जून रोजी स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात एका हॉटेलमध्ये चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पूर्वी सांगितले गेले होते मात्र, नंतर पोलिसांनी सांगितले की, या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीने सहा जण जखमी केल्याचा पोलिसांचा दावा आहे तसेच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो हल्लेखोरही मरण पावला आहे. जखमी झालेल्या सहा लोकांपैकी एक पोलिस कर्मचारीही आहे.
ग्लासगोची घटना भयंकर: पंतप्रधान बोरिस जॉनसन
या घटनेवर चिंता व्यक्त करताना ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की,’ ग्लासगोची ही घटना भयंकर आहे आणि ही एक गंभीर चिंतेची बाब आहे.’ त्याचवेळी गृहसचिव प्रीती पटेल म्हणाल्या की,’ ग्लासगोमधील या घटनेमुळे त्याचा खोलवर बाधा पोहोचविणारी आहे.’ त्याच वेळी, स्कॉटलंडच्या प्रधानमंत्री निकोला स्टेरगिओन म्हणाल्या की,’ही खरोखर एक भयानक घटना आहे.’
प्रीती पटेल यांनी पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले
स्कॉटिश पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक निवेदनानुसार, या घटनेत एक पोलिस अधिकारीही जखमी झाला, तसेच त्याला रुग्णालयातही नेण्यात आले आहे. मात्र आता याक्षणी परिस्थिती नियंत्रणात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सोशल मीडियावर या घटनेतील सगळ्या शूर पोलिस अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि लोकांना घटनास्थळी न जाण्याची विनंती केली.
सशस्त्र पोलिसांकडून झाडण्यात आलेली गोळी लागून ती हल्लेखोर व्यक्ती मरण पावली आहे. त्याचवेळी या चाकूहल्ल्याच्या घटनेत ठार झालेल्या सहाही जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत एक 42 वर्षीय व्यक्तीही जखमी झाला आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती खूपच खराब आहे पण सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांचे वय अनुक्रमे 17, 18, 20, 38 आणि 53 वर्षे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.