धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कबुली

मुंबई । राज्यात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.दरम्यान या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा … Read more

बॉलीवूड एकवटलं! बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात

मुंबई । बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रॉडक्शन हाऊससेससह ३४ प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गेल्या दोन महिन्यात बॉलिवूडची प्रतिमा … Read more

आश्चर्य! जनतेसमोर बोलताना किम जोंग उन यांना अश्रू अनावर; नेमका काय आहे ‘हा’ किस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे जनतेसमोर रडले असे सांगितल्यास कोणालाही विश्वास बसणार नाही. पण असं खरंच घडलं आहे. आपल्या क्रूर कृत्यासाठी प्रसिद्ध असलेले किम जोंग उन यांनी देशातील जनतेसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. यावेळी किम यांच्या डोळ्यात चक्क अश्रू देखील आले होते. कोरोना व्हायरसच्या साथीच्या वेळी मी जनतेसोबत उभा … Read more

जेव्हा माजी मंत्री मुळक म्हणाले, मला दंड करा!….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘टिकलं ते पॉलिटिकल किस्से’ महाराष्ट्राचे माजी मंत्री, नागपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक लोहगाव विमानतळावर निघाले होते. गाडी खडकीच्या पुढं गेल्यावर एका चौकात पोलिसांनी त्यांच्या गाडीला हात केला. गाडी थांबली. एक पोलीस पुढं आले. त्यांनी सांगितलं,”मास्क घातले नाहीत. दंड भरावा लागेल.” बोलताना मास्क खाली घेतले होते. तेवढ्यात दंडाच्या पावतीच पुस्तक घेऊन … Read more

शेतकरी विरोधानंतर सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांवरून मोदी सरकारला बजवली नोटीस

नवी दिल्ली । मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. शेतमालाला चांगला भाव देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेली एपीएमसी यंत्रणा नष्ट करेल, असं याचिकांमध्ये म्हटलं आहे. दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्रातील मोदी सरकारनं पावसाळी अधिवेशनात … Read more

नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर पुन्हा जीभ घसरली, ‘पनवती!’ असा केला उल्लेख

मुंबई । पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर २ तासांनी वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु झाला आहे. दरम्यान, मुंबईत परिस्थिती आता हळुहळु पूर्वपदावर येत असली तरीही विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आमदार … Read more

‘तुमचा गुलाबरावांवर विश्वास पण नाथाभाऊंवर नाही’- चंद्रकांत पाटील

पुणे । ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे, असं गुलाबराव पाटील यांनी नुकतचं म्हटलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी … Read more

MPSC परीक्षा रद्द करताना सरकाने फक्त एका जातीचा विचार केला, बाकीचं काय? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई । “MPSC ची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. (Prakash Ambedkar) मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. … Read more

Mumbai Power Cut: मुंबई वीज पुरवठा खंडितप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

मुंबई । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. सोमवारी सकाळी सव्वा १० वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर २ तासांनी वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरु झाला आहे. दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील … Read more

Mumbai Power Cut: सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का? आशिष शेलारांचा सरकारला करंट

मुंबई । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बत्ती गुल झाली. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा 10 वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने भाजप नेते आशिष शेलार … Read more