पाकिस्तानात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या

thumbnail 1531302133120

पेशावर : पेशावरच्या याकातूत भागात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या करण्यात आली आहे. अज्ञात अतिरेक्यांनी भर सभेत स्फोट घडवून हारुन बिलौर यांची हत्या केली आहे. बिलौर पाकिस्तानातील आवमी नॅशनल पार्टीचे मुख्य नेते होते. पक्षाच्या सभेसाठी ते पेशावरला गेले असता अतिरेक्यांनी त्यांना ठार केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पेशावर येथे … Read more

संजू मोडू शकतो अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड. कमाई जाणार ३००कोटीच्या घरात

thumbnail 1531300613617

मुंबई : २९ जून रोजी पूर्ण देश भर प्रदर्शित झालेल्या संजू चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कल्ला उडवून दिला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४ कोटी रुपयांची कमाई केली तर पहिल्या रविवारी चित्रपटाने ४६ कोटी रुपये कमावले आहेत. संजू प्रदर्शित होण्याअगोदर प्रचारा पेक्षा अपप्रचार खूप करण्यात आला पण लोकांनी कसलीही अस्पृश्यता नबाळता कलाकृतीला मनस्वी दाद दिल्याचे चित्रपटाची कमाई सांगते … Read more

पंढरपूरात वसतिगृह अधीक्षकाने केला सात मुलींचा विनयभंग

thumbnail 1531289562570

पंढरपूर : दक्षिण काशी आणि लाखो वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान म्हणुन पंढरपूर ओळखले जाते. पण याच पवित्र स्थळी एक लज्जास्पद बाब घडली आहे. भक्ती नगरी सोबत पंढरीची शिक्षण नगरी म्हणूनही ओळख आहे. याचाच विचार करून राज्य शासनाने समाज कल्याण खात्याचे शासकीय मुलींचे वसतिगृह उभारले. वसतिगृहचा अधिक्षक संदीप प्रभाकर देशपांडे याने मुलींचा विनयभंग केल्याची बाब उजेडात आली … Read more

तुकोबांची पालखी वरवंड तर ज्ञानोबांची पालखी जेरुरी कडे मार्गस्थ

thumbnail 1531287935203

जेजुरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यवत वरून वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा टप्पा मोठा असून त्याची लांबी ४४ किलो मीटर आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा टप्पा ३९ किलो मीटरचा आहे.

नानार प्रकल्पग्रस्तांचे आज नागपूरात आंदोलन

thumbnail 1531281985570

नागपूर : नानार प्रकल्पग्रस्तांचे आज नागपूरमध्ये आंदोलन आहे. प्रकल्प येण्याने होणारी भीषणता आणि पर्यावरणाच्या हाणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करत आहेत. कोकणवासीयांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे आणि या खेळाला आमचा विरोध आहे असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास २०० प्रकल्पग्रस्त नागपूरच्या यशवंत स्टेडियम वर जमणार असल्याची माहीती आहे. नानार प्रकल्पाविरोधात … Read more

मुंबईत मुसळधार पाऊस, डोंबिवलीत दोन युवक गेले वाहून

thumbnail 1531280977559

मुंबई : मुंबईचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. लोकांना दूध आणि भाजीपाला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवर ठिकठिकानी पाणीची डबकी साचली आहेत. अशातच डोंबिवलीमधे दोन युवक वाहून गेले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हर्षद … Read more

पाकिस्तानातील पहिल्या शीख पोलीस अधिकार्याला राहत्या घरातून हाकलले

thumbnail 1531261525601

लाहोर : पाकिस्तानमधे सध्या शिख धर्मियांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. पाकिस्तानातील शिख धर्मियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील पहिला शीख पोलीस अधिकारी गुलाब सिंग याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्ती बाहेर हाकलण्यात आले आहे. विषेश म्हणजे असे करण्यामागे पाकिस्तानचे पोलीस खातेच असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पाकिस्तान पोलीसांनी … Read more

बुलेट ट्रेनला लागू शकतो ब्रेक

thumbnail 1531242791152

मुंबई ते अहमदाबाद संकल्पित बुलेट ट्रेनला अनेक अडचणीतून जावे लागत आहे. पालघर मधील फलोत्पादक शेतकऱ्यांनी केलेला विरोध मावळतो ना मावळतो तोपर्यंत नवीन समस्या बुलेट ट्रेन समोर येऊन उभी ठाकली आहे. विक्रोळी मध्ये स्थित गोदरेज कंपनीच्या मालकीच्या ३.५ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केल्या शिवाय बुलेट ट्रेन पुढे सरकू शकत नाही. गोदरेज कंपनी च्या जमिनीचे बाजार मूल्य ५०० … Read more

सुमित्रा महाजनांनी लिहले खासदारांना पत्र, संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावण्याचे अावाहन

thumbnail 1531238978789

दिल्ली : १८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना पत्र लिहले आहे. १६ व्या लोकसभेची फक्त ३ अधिवेशने बाकी राहिली असून येत्या काळात आपण संसदेच्या अधिवेशनाचा वेळ कारणी लावावा असे अावाहन सुमित्रा महाजन यांनी केले आहे. सुमित्रा महाजन यांनी पत्रामधे त्यांच्या परदेश दौऱ्याचा उल्लेख … Read more

भाजप झाला विधान परिषदेत सर्वात मोठा पक्ष, करू शकतो सभापती पदावर दावा

thumbnail 1531238213374

नागपूर : भाजप आता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजपचे विधान परिषदेत २१ सदस्य झाले आहेत. त्यामुळे भाजपला अाता विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. भाजपचे सद्याचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पाय उतार व्हायला लावायची भाजपची योजना असल्याचे बोलले जाते. हल्लाबोल आंदोलन आणि विधी मंडळातील आक्रमकपणा यामुळे भाजप राष्ट्रवादीच्या … Read more