बराक ओबामांनी कोरोना पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी कोरोना विषाणूशी संबंधित काही अधिकाऱ्यांवर टीका केली आणि म्हटले की,” या साथीच्या रोगावरून असे दिसून येते की, येथे बरेच अधिकारी असे आहेत जे आपण प्रभारी असल्याचे दाखवतही नाहीत.”

‘हिस्टोरिकली ब्लॅक कॉलेजिस अँड युनिव्हर्सिटीज’च्या दोन तासांचा कार्यक्रम “शो मी योर वॉक” मध्ये ओबामा यांनी हे सांगितले. हा शो यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर प्रसारित झाला.

ते म्हणाले, “या साथीने अनेक महत्वाच्या गोष्टींवरून पडदा पूर्णपणे काढून टाकला आहे. येथे अनेक प्रभारी अधिकाऱ्यांना माहित आहे की ते काय करीत आहेत. तसेच त्यांच्यापैकी बरेचसे आपण प्रभारी असल्याचे भासवत देखील नाहीत. कोरोनाचा समाजावर चुकीचा परिणाम झालाय “. अशी टीका करताना ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा इतर कोणत्याही फेडरल तसेच राज्य अधिकाऱ्याचे नाव मात्र घेतलेले नाही.

फेब्रुवारी महिन्यात जॉर्जियातील रहदारीच्या रस्त्यावर जॉगिंग करताना अहमद आर्बरी (२५) यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या घटनेचा उल्लेखही या माजी राष्ट्राध्यक्षांनीही यावेळी केला.

ते म्हणाले, “कोविड -१९ चा आमच्या समाजावर झालेला विसंगत परिणाम आम्हाला दिसतोय. आपण पाहिले आहे की, जेव्हा एखादा काळा माणूस फिरायला जातो तेव्हा काही लोकांना असे वाटते की ते त्या व्यक्तीला रोखू शकतील आणि जर त्याने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर ते त्याला थेट गोळी घालू शकतील.”

या साथीच्या रोगाचा सर्वाधिक परिणाम हा अमेरिकेमध्ये झालेला पहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाव्हायरसची ४७ लाखाहून अधिक प्रकरणे आढळली आहेत, त्यापैकी १.५ लाखाहून अधिक प्रकरणे ही एकट्या अमेरिकेतून समोर आली आहेत. या देशात आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याच वेळी इथे ३ लाखाहून अधिक लोक बरे देखील झालेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.