लाखो PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून ATM शी संबंधित ‘हे’ नियम बँक बदलणार आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (PNB) ने 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोठा बदल घडवणार आहे. चांगल्या बँक सुविधा आणि एटीएम फ्रॉडच्या व्यवहारापासून ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी पीएनबीने हे पाऊल उचलले आहे. बँक वन टाइम पासवर्ड आधारित कॅश पैसे काढण्याची सिस्टम आणणार आहे. ही नवीन यंत्रणा 1 डिसेंबर 2020 पासून सुरू होईल. त्याअंतर्गत तुम्हाला एटीएममधून कॅश काढण्यासाठी बँकेकडे रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी द्यावा लागेल. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांना लागू असेल. एका ट्वीटद्वारे बँकेने याबाबतची माहिती दिली आहे.

पीएनबीच्या ट्विटनुसार, 1 डिसेंबरपासून दुपारी 1 ते 8 या दरम्यान, पीएनबी 2.0 एटीएममधून एका वेळी 10,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश रक्कम काढणे आता ओटीपी आधारित असेल. म्हणजेच पीएनबी ग्राहकांना या रात्रीच्या वेळी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. यावेळी ग्राहकांना त्यांचा मोबाईल सोबत घेऊन जायला लागेल.

पीएनबी 2.0 काय आहे ते जाणून घ्या
युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे, जे 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आले. यानंतर अस्तित्वात आलेल्या एंटिटीला पीएनबी 2.0 असे नाव देण्यात आले आहे. बँकेच्या ट्वीट आणि मेसेजमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, ओटीपी आधारित कॅश फक्त पीएनबी 2.0 च्या एटीएममध्ये लागू होईल. म्हणजेच इतर बँक एटीएममधून पीएनबी डेबिट / एटीएम कार्डमधून पैसे काढण्यासाठी ओटीपी आधारित कॅश काढण्याची सुविधा लागू होणार नाही.

https://twitter.com/pnbindia/status/1331896212492931073?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1331896212492931073%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fpnb-introduce-new-way-of-atm-cash-withdrawal-from-1st-december-2020-otp-based-cash-withdraw-facility-samp-3355996.html

ही सिस्टिम कशी काम करेल

> पीएनबी एटीएमवर पैसे काढण्यासाठी बँक आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवेल.

> हा ओटीपी फक्त एका व्यवहारासाठीच उपयोगाचा असेल.

> या नवीन सिस्टममधून कॅश काढून काढण्याच्या सध्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.

> याद्वारे बनावट कार्डांमधून अवैध व्यवहार रोखले जाईल असे बँक सांगते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment