मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता.
बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी थेट शरद पवारांना उद्देशून राष्ट्रवादीला उत्तर दिले आणि “आशिष अभ्यास कर”, “सुधीर अर्थव्यवस्था सांभाळ”,”विनोद बाहेर जा!” राष्ट्रवादीने अशी उत्तर देऊन भाजपा ला धोबीपछाड करायचा प्रयत्न केलाय.
यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकाच्या इर्शेवर हे करू लागले,आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेऊन हि ट्रोला-ट्रोली चांगलीच रंगतदार बनवत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यावर हे कार्यकर्ते तुटून पडले आहेत.