हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे नितेश राणे हे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करत असतात. आता असाच एक खुलासा त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करून केला आहे. नितेश राणे यांनी बृहन्मुंबई महापालिका खरेदी करत असलेल्या मृतदेहांच्या पिशव्यांची किंमत जाहीर केली आहे. जी तुलनेने पाचपट असल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांनी एवढ्या महाग किंमतीत बीएमसी या पिशव्या खरेदी करते? असा सवाल केला असून हे खूपच तिरस्करणीय असल्याचे म्हंटले आहे.
वेदांत इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून बीएमसी या पिशव्या खरेदी करत आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी, वेदांत इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड बीएमसी ला मृतदेहांच्या पिशव्या ६७१९ रु ला देते? असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले. तर मुंबई, पुणे किंवा औरंगाबादच्या बाजारात या पिशव्यांची किंमत १५००रु पेक्षा जास्त नाही असेही सांगितले आहे. सहापट अधिक किंमतीत या पिशव्या खरेदी केल्या जात असल्याचे त्यांनी म्हंटले आणि हे तिरस्करणीय असल्याचा उल्लेख केला आहे.
Vendant innotech Pvt ltd supplies body bags to BMC at a whopping ₹6719 each bag??!!
when the cost of these bags r not more than 1500 max in the mumbai..pune or Aurangabd markets!
They buy body bags 6 times it’s prize!
Greed at the times of such crisis is disgusting!! pic.twitter.com/uJvj63ieyt— nitesh rane (@NiteshNRane) June 12, 2020
दरम्यान महाराष्ट्रात ३,५९० रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना महाग किंमतीच्या या पिशव्या घेणे हाही एक मुद्दा आहेच. आता यावर सरकार काय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या ट्विटची चांगलीच चर्चा झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.