1 लाख रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतेक वस्तूंची विक्री घसरली होती, परंतु यावेळी बिस्किटांच्या विक्रीत कमालीची वाढ झाली. यावेळी सर्वच बिस्किट कंपन्यांची बिस्किटे विकली गेली. बिस्किटांच्या या विक्रमी विक्रीमुळे कंपन्यांची चांदी झाली. बिस्किट बनविणार्‍या कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली. याकाळातच बिस्किट निर्माता पार्लेने एक नवीन विक्रम नोंदविला होता. पार्ले-जी बिस्किटे इतकी विकली गेली आहेत की गेल्या 82 वर्षातील विक्रम मोडला गेला आहे. अशा परिस्थितीत, बेकरी प्रॉडक्ट युनिट बसविणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

जर तुम्हालाही बेकरी इंडस्ट्री यायचे असेल तर मोदी सरकार स्वतः यासाठी तुम्हाला मदत करीत आहे. मुद्रा योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकूण खर्चाच्या 80 टक्के पर्यंतची तरतूद सरकारकडून केली जाईल. यासाठी सरकारने स्वतःच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे. सरकारने केलेल्या व्यवसायाच्या रचनेनुसार सर्व खर्च कमी केल्यावर तुम्ही दरमहा 30 हजार रुपयांची कमाई करू शकता.

किती खर्च येईल ?
प्रकल्प उभारणीसाठी एकूण खर्च: 3.36 लाख रुपये – यामध्ये तुम्हाला स्वतःकडून फक्त 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. या मुद्रा योजनेंतर्गत तुमची निवड झाल्यास तुम्हाला बँकेकडून 2.87 रुपयांचे टर्म लोन आणि 1.49 लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटल लोन मिळेल. या प्रकल्पांतर्गत आपल्याकडे 500 चौरस फुटांपर्यंतची आपली जागा असावी. जर ती नसेल तर भाड्याने घेऊन प्रोजेक्ट फाईल मध्ये दाखवावी लागेल.

नफा किती असेल ?
शासनाने तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार एकूण वार्षिक उत्पादन व विक्रीचे अंदाजे 5.36 लाख रुपये अशा प्रकारे अंदाजित केले गेले आहे.
4.26 लाख: संपूर्ण वर्षासाठी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन
20.38 लाख रुपयेः वर्षभरात इतके प्रोडक्ट तयार केले जाईल की त्याच्या विक्रीवर 20.38 लाख रुपये मिळतील. यामध्ये बेकरी प्रोडक्टची विक्री किंमत ही बाजारात मिळणाऱ्या इतर वस्तूंच्या दराच्या आधारे काही प्रमाणात कमी करून निश्चित केली गेली आहे.
6.12 लाख रुपये: ग्रॉस ऑपरेटिंग प्रॉफिट
70 हजार: एडमिनिस्ट्रेशन आणि विक्रीवरील खर्च
60 हजार: बँक कर्जाचे व्याज
60 हजार: इतर खर्च
निव्वळ नफा: वार्षिक 4.2 लाख रुपये

मुद्रा योजनेसाठी अर्ज करा
यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत आपण कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. यासाठी, आपल्याला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये आपल्याला हे डिटेल्स द्यावे लागतील … नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे. कोणतीही प्रक्रिया शुल्क किंवा हमी शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. कर्जाची रक्कम 5 वर्षात परत करू शकता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in