हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून लोकांना एक भुरळ घालणारी बातमी व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीमध्ये असा दावा केला गेला आहे की, केंद्र सरकार पंतप्रधान कन्या आयुष योजनेंतर्गत (PM Kanya Aysh Yojana) अंतर्गत प्रत्येक मुलीला 2 हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. असे सांगितले जात आहे की, या योजनेंतर्गत सरकार ही रक्कम थेट प्रत्येक मुलीच्या बँक खात्यात (DBT) ट्रान्सफर करीत आहे.
या व्हायरल बातमीमध्ये केलेला दावा पूर्णपणे बनावट असल्याचे दिसून आले
पीएम कन्या आयुष योजनेविषयी या व्हायरल बातमीमध्ये ही माहिती देण्यात आलेली नाही की, या अंतर्गत देशातील प्रत्येक मुलीला आर्थिक मदत दिली जाईल किंवा फक्त गरीब तसेच वंचित घटकातील मुलींनाच याचा लाभ मिळेल. हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही, असे प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) म्हटले आहे. अशा चुकीच्या योजनांपासून सावध रहा. यासाठी अर्ज करणार्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो.
Claim: The government is providing ₹2000 to every girl child under Pradhan Mantri Kanya Ayush Yojana. #PIBFactCheck: This claim is #Fake. There is no such scheme under the central government. Please beware of such bogus schemes! pic.twitter.com/dYLWHul3Kx
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 5, 2020
सन 2015 मध्ये केंद्राने सुकन्या समृद्धि योजना सुरू केली
2015 मध्ये केंद्र सरकारने मुलींच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धि योजना (SSY) सुरू केली. मुलींचे शिक्षण व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू केली गेली. लग्न व दोन मुलींच्या लग्नाच्या वेळी आर्थिक मदत देणे हा त्या मागचा हेतू आहे. PIB ने स्पष्टीकरण दिले की, पंतप्रधान कन्या आयुष योजना पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. जर असे मेसेज किंवा पोस्ट आपल्या समोर आल्या तर त्यावर विश्वास ठेवू नका. या योजनेच्या अर्जासाठी कोणतीही अधिकृत वेबसाइट उपलब्ध नाही आहे.
बनावट मेसेजमध्ये अर्जासाठी ही माहिती विचारली जाते
पंतप्रधान कन्या आयुष योजनेविषयी व्हायरल पोस्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, या योजनेंतर्गत शाळेत शिकणार्या मुलींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल. यात असेही म्हटले गेले आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असले पाहिजे, जे आधार कार्डशी जोडलेले गेलेले पाहिजे. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठीचे वय मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या बनावट पोस्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आणि पासपोर्ट आकाराची फोटोकॉपी लागतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.