वुहान येथून बेपत्ता झालेला पत्रकार २ महिन्यांनंतर सापडला,गायब होण्यामागचे कारण सांगितले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील कोरोनाव्हायरस या साथीच्या सुरुवातीच्या काळात वुहानमधून गायब झालेला एक नागरिक पत्रकार सुमारे २ महिन्यांनंतर परत आला आहे.वुहानच्या या नागरिक पत्रकाराने कोरोना विषाणूशी संबंधित व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिलेली होती. त्यानंतर तो अचानक गायब झाला.परत आल्यावर पत्रकाराने सांगितले की चीनी पोलिसांनी त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि क्वारंटाइन केले.

ली येहुआ वुहान त्या पत्रकारांपैकी एक होता ज्यांनी पुढे येऊन कोरोना विषाणूचा अहवाल दिलेला होता.साथीच्या आजाराच्या या सर्वात भीतीदायक दिवसांमध्ये तो वुहानचे खरे चित्र जगासमोर घेऊन येत होता.नागरिक पत्रकार ली येहुआ याला शेवटचे फेब्रुवारी २६ रोजी पाहिले गेले होते. गायब होण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये एक पांढरा एसयूव्ही त्याचा पाठलाग करताना दिसली होती.या प्रदीर्घ लाइव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओच्या शेवटी, अनेक एजेंट्स हे त्याच्या अपार्टमेंटमध्ये घूसताना दिसतात.

२६ फेब्रुवारी रोजी वुहान येथून पत्रकार झाला होता बेपत्ता
युट्यूब, वेइबो आणि ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसंदर्भात ली याने सांगितले आहे की २६ फेब्रुवारी रोजी तो आपल्या कारसह वूशांग जिल्ह्यात फिरत होता. त्यानंतर पांढऱ्या एसयूव्हीमधील काही लोकांनी त्याला आरडाओरडा करून थांबण्यास सांगितले.यावर तो अस्वस्थ झाला आणि वेगात गाडी चालवू लागला.यानंतर त्याच्या अपार्टमेंटमध्ये तीन जण दाखल झाले.त्यांनी स्वत: ला सार्वजनिक सुरक्षेचे कर्मचारी आहोत असे म्हटले आणि लीसह पोलिस स्टेशनमध्ये गेले.जनतेत गडबडी आणल्याच्या आरोपावरून त्याची चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले.नंतर,पोलिसांनी सांगितले की तो साथीच्या ठिकाणी गेला आहे त्यामुळे त्याला क्वारंटाइन ठेवणे आवश्यक आहे.

पोलिसांनी पोलिसांकडून १ महिन्यासाठी क्वारंटाइन ठेवले गेले
पुढच्या एका महिन्यासाठी लीला क्वारंटाइन ठेवण्यात आले.यावेळी त्याला वुहान आणि त्याच्या होम टाऊनच्या अनेक भागात ठेवण्यात आले.क्वारंटाइन मध्ये असताना, त्याला दिवसातून तीन वेळा जेवण दिले जात असे आणि त्याच्या घराच्या बाहेर नेहमी गार्ड तैनात असत.

त्यावेळी पोलिसांनी पूर्ण सहकार्य केल्याचे लीने म्हटले आहे. त्याला वेळेवर भोजन देण्यात आले आणि त्याची कायद्याप्रमाणे काळजी घेण्यात आली.लीने सांगितले की त्याला २८ मार्च रोजी सोडण्यात आले.यानंतर त्याने आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवला.लीने प्रार्थना केली की संक्रमित लोक लवकर बरे व्हावेत आणि चीनसह संपूर्ण जग या संसर्गापासून मुक्त व्हावे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment