हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशी प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सूचक असे ट्विट केले आहे. “कोई काफ़ी अकेला है, और कोई अकेला ही काफ़ी है”, असे ट्विट करीत वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “कोई काफ़ी अकेला है, और कोई अकेला ही काफ़ी है. जंग में जीत के आने के लिए काफी है, वह जमाने के लिए अकेला ही काफी है हमारी हकीकत को ख्वाब समझने वाले, वो तुम्हारी नींद उड़ाने के लिए एक ही अकेला काफी है, असे म्हणून आज वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला एक प्रकारे इशाराच दिला आहे.
#ISupportDevendrabjp pic.twitter.com/h829BMVGsw
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 13, 2022
दरम्यान देवेंद्र फडणवीस याची आज चौकशी करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवरती भाजप नेत्यांकडून टीकास्त्र डागले जात आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून पलटवार करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी भाजपकडून केंद्रीय यंत्रणेचा वापर केला जात आहे. मग पोलिसांकडून साधी चौकशी झाली तरी त्या विरोधात भाजप नेते बोलत आहेत, असे भुजबळ यांनी म्हंटले आहे.