सिंधुदुर्ग । कोरोना संकटकाळात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी झाले आहे. असा डंका राणे कुटुंबीयांनी सुरु ठेवला आहे. त्यासंदर्भात ते सातत्याने आपल्या सोशल मीडियावरून विविध पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी राणे बंधूनी केईएम रुग्णालयातील मृतदेह तसेच एका रुग्णालयात रुग्णांना दिले जाणारे अन्न याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेअर केले होते. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉंटवरून सिंधुदुर्ग येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागातील एक व्हिडीओ शेअर करून प्रत्येकाचा जीव धोक्यात असल्याचे ट्विट केले आहे.
संचारबंदीच्या सुरुवातीपासून गेले अनेक दिवस महाराष्ट्रातील राजकारणाने जोर धरला आहे. वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. चर्चाना उधाण आले आहे. आणि रोज एक नवा मुद्दा घेऊन सरकार कसे अपयशी आहे हे विरोधी पक्ष सिद्ध करू पाहत आहे. यामध्ये राणे कुटुंबीय ही मागे नाहीत. नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये Covid च्या आयसोलेशन वार्ड मध्ये सुरु असणारे कन्स्ट्रक्शन दिसते आहे. वार्ड मध्ये रुग्ण असताना काम सुरु आहे. सर्वांचेच जीव धोक्यात आहेत असे ट्विट त्यांनी यासोबत केले आहे.
This is COVID isolation ward in civil hospital Sindhdurg where construction work is goin with patients around..Risking everyone’s life!! pic.twitter.com/jmcWyvpFoW
— nitesh rane (@NiteshNRane) May 28, 2020
त्यांच्या या आणखी एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. ज्या बेडवरुन रुग्ण उतरवला जातो तो पुन्हा बेडवर जात असताना बेडचे निर्जंतुकीकरण केले जात नाही म्हणजे लागलीच वाट अशी प्रतिक्रिया या व्हिडिओवर आली आहे. तर दुसरीकडे हे वार्ड साठी महत्वपूर्ण आणि रुग्णांसाठीचे काम असण्याची शक्यता आहे. विनाकारण लोकांमध्ये असे व्हिडीओ शेअर करून भीती निर्माण करू नका अशा प्रतिक्रियाही येत आहेत. महाराष्ट्राचे राजकारण या काही दिवसात अधिकच रंजक झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.